कणकवली नगरपंचायतीच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचा विशेष कॅम्प.

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेचा विशेष कॅम्प.

कणकवली.

   कणकवली नगरपंचायतीच्या वतीने  प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा विशेष कॅम्प आयोजित केला आहे. पुढील 8 दिवस हा कॅम्प शहरात विविध  ठिकाणी दिलेल्या तारखेनुसार होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी दिलेल्या ठिकाणी सकाळी 10.30  ते सायं. 5.00 यावेळेत जावून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे.असे आवाहन कणकवली  नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
     कॅम्पचे दीन पुढील प्रमाणे,सोमवार दि. 16/10/23 - सिद्धार्थनगर समाज मंदिर, मंगळवार दि. 17/10/23- कणकवली नगरपंचायत कार्यालय, बुधवार दि.
18/10/23- जि.प. शाळा न. 1 आचरा रोड, गुरुवार दि. 19/10/23- जि.प. शाळा न. 5  शिवाजीनगर, शुक्रवार दि. 20/10/23- जि.प.शाळा न. 3 भालचंद्र महाराज मठ,  आणि बुधवार दि. 25/10/23 ते शुक्रवार 27/10/23 या कालावधीत कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे हा कॅम्प होणार आहे.तरी  पिवळे, अंत्योदय कार्ड धारक, केशरी रेशनकार्ड धारक यांनी वरील ठिकाणी रेशन कार्ड /आधार कार्ड व मोबाईल घेऊन उपस्थित राहून आपले कार्ड काढून घ्यावे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार शासनाच्या वतीने मिळणार आहे.