सावंतवाडी वनविभागाच्या वतीने जलद बचाव पथकाची स्थापना.

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने जलद बचाव पथकाची स्थापना.

सावंतवाडी.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी  मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात.तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असताना आपण पाहतो  त्यावर उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या हस्ते व सहा. वनसंरक्षक सुनील लाड, सहा. वनसंरक्षक परिविक्षाधीन नेहा वानरे यांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथक RRT (Rapid Rescue team) ची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी वनक्षेत्रपाल क्षीरसागर व वनक्षेत्रपाल कुंभार तसेच इतर वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वन्यप्राणी बचाव करणे बरोबरच या पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नजीक वन्यप्राणी यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात RRT टीम मार्फत पिंजरे लावून वन्यप्राणी विशेषतः माकड यांना पकडून त्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. तरी अश्या प्रकारे मनुष्यवस्तीत  वन्यप्राणी आढळल्यास या बाबतची माहिती तात्काळ विभागीय कार्यालय येथील RRT कंट्रोल रूम ला हेल्पलाइन क्रमांक +91 2363-272005 देण्यात यावी असे आवाहन माकड यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.