माजी उपसरपंच चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित.

माजी उपसरपंच चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित.

कणकवली.

  तालुक्यातील ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार बेळगांव येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली व माजी खा. अमरसिंह पाटील यांच्या हस्ते बबली राणे यांना सन्मानित करण्यात आले.
   दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या पाच राज्यांतील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदनपत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरुपी हार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्याची पोचपावती या पुरस्काराच्या रुपाने मिळाली असल्याची प्रतिक्रिया.श्री. राणे यांनी दिली.