स्वदेश दर्शन अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन.

सिंधुदुर्ग.
केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील सहभागीदार यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असल्याची, माहिती उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात प्रत्येक स्तरावर मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी आणि कौशल्य क्षमता वाढविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील सहभागीदार यांच्याकरीता नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग पर्यटन क्षेत्र व्यवस्थापन समिती आणि आय.एच.एम.मुंबई यांच्या संयुक्त आयोजित करण्यात येत आहे.
पर्यटन जागरुकता प्रशिक्षण कार्यक्रम,(Tourism awareness porgram), कालावधी 2-3 दिवस, वयोमर्यादा किमान 18 वर्ष, सहभागी होऊ शकणारे, टॅक्सी/ बस चालक पर्यटकांना हाताळण्यात गुंतलेले कर्मचारी स्मारक कर्मचारी,पर्यटन केंद्र कर्मचारी, पोलीस विभाग कर्मचारी, मार्गदर्शक, सर, वेटर्स, हेल्पर, आचारी, कुक, शेफ, हॉटेल रेस्टॉरट फ्रंट, ऑफिस कर्मचारी, रिसेप्शन, काऊटर कर्मचारी, फुड, किऑस्कचे कर्मचारी, ढाबा कर्मचारी, कला हस्तकला,संस्कृती आणि पर्यावरणात क्षेत्राशी संबंधीत लोक इत्यादी.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्र: कौशल्य चाचणी आणि प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम (Skill testing & Certification), कालावधी 6 दिवस, किमान 18 वर्षे सहभागी होऊ शकणारे, आचारी, कुक, शेफ, हॉटेल, रेस्टॉरट, फ्रंट ऑफिस कर्मचारी, रिसेप्शनिस्ट आणि हाऊसकीपिंग स्टाफ, सुरक्षा रक्षक, व्यवस्थापन कर्मचारी, हॉटेल, रिसोर्ट, फार्म स्टे, होमस्टे, तसेच कृषी पर्यटक केंद्रात कार्यरत कर्मचारी इत्यादी.
भाषिक पर्यटक सुविधा प्रशिक्षण कार्यक्रम (Linguistic tourist faciliators program), कालावधी 6 दिवस किमान 18 वर्षे, सहभागी होऊ शकणारे, स्मारके कर्मचारी, पर्यटन केंद्र कर्मचारी, पोलीस विभाग कर्मचारी, पर्यटन मार्गदर्शक इत्यादी.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे माध्यमातून मुलभूत पर्यटन जागरुकता, संभाषण कौशल्य, रेस्टॉरटची स्वच्छता, प्रथमोपचार, अपघात टाळणे, ग्राहक हाताळणी, वर्तणूक कौशल्य, स्वयंपाक सेवा, अन्न सादरीकरण, आरोग्य आणि सुरक्षा, व्यवहारीक कौशल्य, वैयक्तिक आणि कामाची स्वच्छता, पर्यावरणीय मार्गदर्शक तत्वांनुसार कचरा विल्हेवाट, इत्यादी कौशल्य व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/DQiW1YmQGQWdQdWf6 या लिंक टाईप करुन किंवा बारकोड स्कॅन करून फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी ८८७९४७४४०४ या क्रमांकावर संपर्क करावा, त्याचप्रमाणे जिल्हा व्यवस्थापन समिती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रत्यक्ष नोंदणी करता येईल. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सहभागीदारानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे अवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईचे उपसंचालक (पर्यटन) हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.