कांदळगाव येथे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला वन विभागाकडून जीवदान.

मालवण.
तालुक्यातील कांदळगाव येथे खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी वन परिमंडळ मालवण श्रीकृष्ण परीट यांना देण्यात आली.यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता.सदर खवले मांजर संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले त्यांनी सदरची घटना पार्थ डिचवलकर यांना सांगून वनकर्मचारी यांच्या मदतीने सुखरूप सुटका करून वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांचे ताब्यात दिले.खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे.
सदरचे बचाव कार्य उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ वन अधिकारी मालवण श्रीकृष्ण परीट, वनकर्मचारी अनिल परब, ग्रामस्थ संतोष पारकर, पार्थ डीचवलकर नारायण मिस्त्री लवेश आयकर तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य स्वप्निल गोसावी, दर्शन वेंगुर्लेकर यांचे उपस्थित पार पडले.
या खवले मांजरास पशुधन विकास अधिकारी मालवण रवींद्र दळवी यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.कोणताही वन्यप्राणी लोकवस्ती किंवा विहिरीत पडल्याची घटना घडल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचे आव्हान करून कांदळगाव ग्रामस्थांचे व युथ बीट फॉर क्लायमेटच्या सदस्यांचे परिमंडळ वनाधिकारी मालवण श्रीकृष्ण परीट यांनी आभार मानले.