सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील पोलीस पाटील पदाची अर्ज प्रकिया उद्यापासून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन.

सावंतवाडी.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यातील 125 पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस पाटील पदासाठी उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विवाहित महिला असेल तर त्यांनी विवाह नोंदणी दाखला तसेच महसूल गावातील रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीन तालुक्यात 125 महसूल गावामध्ये पोलीस पाटील भरती निवड प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकारणे व भरणे अशी प्रक्रिया होणार आहे. अर्जासाठी 25 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील 36, वेंगुर्ला 72 दोडामार्ग 17 अशी पोलीस पाटील भरती निवड प्रक्रिया होणार आहे. तरी या कालावधीत जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर व तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.