वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन १ ऑक्टोंबर रोजी.

वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन १ ऑक्टोंबर रोजी.

वेंगुर्ला.

   ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ल्याचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहे.
  यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा व वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच स्मरणिकेचेही प्रकाशन होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष एस.एस. काळे यांनी केले आहे.