मालवण येथे छत्री पेंटिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण
मुलांच्या अंगभूत कला गुणांना चालना देण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने पावसाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या छत्री पेंटिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या छत्र्या लक्षवेधी ठरल्या.कार्यशाळेचा शुभारंभ ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते पांडुरंग ऊर्फ अण्णा मोरजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कला शिक्षक बी. जी. सामंत, राखी अरदकर यांनी मार्गदर्शन केले. कलातज्ञ एस. वाय. कोरे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यशाळेत सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, मंगलताई परुळेकर, संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर आदी उपस्थित होते. या छत्री पेंटिंग कार्यशाळेसाठी लागणारे रंग मेसर्स एस. पी. मोरजकर यांनी पुरविले होते. या कार्यशाळेच्या यशामध्ये टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, ल. टो. कन्याशाळा, रेकोबा हायस्कूल, ओझर विद्यामंदिर, भंडारी हायस्कूल या शाळांच्या एकूण १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुलांसोबतच त्यांचे पालक व शिक्षक आणि सेवांगण कर्मचारी यांनी ही कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेतली होती. मुलांचा उत्साह आणि कलाप्रेम पाहून संयोजक थक्क झाले. सर्व मुलांना अल्पोपहार देण्यात आला.सुत्रसंचालन वैष्णवी आचरेकर यांनी केले. स्वागत करत सोनाली कोळंबकर यांनी आभार मानले. तर इतर सर्व व्यवस्था तेजस्विनी पाताडे, शितल कदम, रविंद्र बागवे, धर्माजी कांबळी, भालचंद्र मळेकर, नारायण तारी यांनी केली. उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यशाळा अविस्मरणीय झाली.

konkansamwad 
