पोस्टमास्तर जनरल पणजी कार्यालयात ७ ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत.

पोस्टमास्तर जनरल पणजी कार्यालयात ७ ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत.

सिंधुदुर्ग.

    पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 7ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली आहे.
   निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. आपले अर्ज श्री महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे 26 जुलै रोजी रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. अर्ज सादर करु शकता. 26 जुलै 2024 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.