हातीव नं.१ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

रत्नागिरी.
संगमेश्वर तालुक्यातील हातीव नं.१ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती देवरुखच्या योग शिक्षिका शीतल पंडित व मुग्धा पाथरे यांनी योगाचे विविध प्रकार आसनांचे प्रकार प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून करून घेतले.
यावेळी निवे खुर्द परबवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक सुनिल करंबेळे यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व सांगताना आपला शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास करण्याचे सामर्थ्य योगात असून नेहमी सकाळचा एक तास प्रत्येकाने स्वतःसाठी देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सरपंच नंदकुमार कदम यांनी शुभेच्छा देताना सर्वांनी योग साधना करणे काळाची गरज आहे असे सांगितले. उपस्थित योग शिक्षिका पंडित व पातरे यांचे शाळेच्या वतीने स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सरपंच नंदकुमार कदम, शिक्षिका रूपाली मांगले यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य सेविका भांड्ये मॅडम, गावच्या आशा शिवगण, शाळा व्यवस्थापन सदस्य संजय कांबळे, आरोग्य मदतनिस मेस्त्री मॅडम, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विनय होडे व श्रीकांत केसरकर यांनी केले. आभार रुपाली मांगले यांनी मानले.