विद्यामंदिर कणकवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
कणकवली.
राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण सेना योजना व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत दरवर्षी राबविला जाणारा वृक्षारोपण कार्यक्रम विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे अतिउत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, पर्यवेक्षिका व्ही.बी.जाधव आणि प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जांभूळ, काजू, आवळा, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हणाले की वृक्ष लागवड महत्त्वाची आहेच पण वृक्ष संवर्धन हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, देशाचे कार्य आहे असे समजून वृक्ष संवर्धन सर्वांनी केले पाहिजे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री बेलेवलकर यांनी वृक्षांचे वैज्ञानिक उपयोग सांगितले.
याप्रसंगी वनक्षेत्रपाल इंदुलकर व श्रीमती शेवाळे उपस्थित होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाचे प्रसाद राणे, संदीप नागभीडकर, विद्या शिरसाट तसेच ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे यांनी विशेष मेहनत व उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे राबवला.