दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न.

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न.

सिंधुदुर्ग.

     सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ जून रोजी कट्टा शाळा नं.1 येथे दिव्यांग बांधवांचा कॅम्प घेण्यात आला. त्यावेळी गणेश वाईरकर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी कुबल मॅडम,गणेश शिरसाठ ,सामंत, चंद्रकांत वराडकर, राजेंद्र माणगावकर ,अनिल पाटील, तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
   मान्यवरांच्या हस्ते हेलेन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना झाल्यानंतर संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना शासकीय योजना तसेच दीव्यांग उपयोगी साहित्य व उपकरणा संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.
   या मेळाव्यामध्ये गोळवण, कुमामे, डीकवल,कट्टा गुरामवाड, वराड, पेंडुर खरारे, तिरवडे,नांदोस या गावातील दिव्यांग बांधवांचा समावेश होता. मेळाव्याला सुमारे 60 हून जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते.