औदुंबर सेवा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

औदुंबर सेवा ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

वैभववाडी.

   औंदुबर सेवा ट्रस्ट नाधवडे ही संस्था नाधवडे गावापुरती मर्यादित नसून या ट्रस्टच काम हे पंचक्रोशीत विखुरले असुन तिचे काम खुप कौतुकास्पद आहे.या ट्रस्टच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात.याचाच फायदा गावातील सर्व शाळांना झाला आहे.असे प्रतिपादन वैभववाडी गटशिक्षण अधिकारी शिनगारे  यांनी केले.ते नाधवडे येथिल प.पु.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने नाधवडे गावातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळाच्या मुलांना वर्षभर पुरतील येवढ्या वह्या वाटप च्या प्रसंगी बोलत होते.हा कार्यक्रम नाधवडे येथिल औदुंबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर यांच्या घरासमोरील दत्तमंदिरात संपन्न झाला.यावर्षी पुर्व प्राथमिक शाळा शिडवणे नं.१ च्या १ ते ७ पर्यतच्या ५७ मुलांना वह्या वाटप करण्यात आले.यासाठी जि.प.सदयक्ष बाळा जठार यांचे विषेश सहकार्य लाभले.
    नाधवडे येथिल औदुंबर सेवा ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी वह्या वाटप, गावातील शाळांना मुक्त गणवेश वाटप, वृक्षारोपण, गरजूना आरोग्यदूट्या मदतीचा हात असे विविध उपक्रम राबविले जातात.
   यावेळी व्यासपीठावर पं.स.वैभववाडी माजी सभापती बाप्पी मांजरेकर, पोलिस बिट अंमलदार शिगाडे मॅडम .नाधवडे सरपंच श्रीरंग पावस्कर, लिना पांचाळ, माजी जि.प.सदश्य सुधिर नकाशे, माजी सभापती बंड्या मांजरेकर,जिल्हा शांतता कमिटी सदश्य परशुराम इस्वलकर, गावप्रमुख किशोर कुडतरकर, शंकर प्रा.से.सोसायटी माजी चेअरमन बबनदादा कुडतरकर, रविंद्र गुंडये, व्हाइस चेअरमन संतोष पेडणेकर, नाधवडे पोलिसपाटिल पांडुरंग कोर्लेकर, दिपक पार्टे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबू तावडे, कलमट ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, वैभववाडी जिल्हा बॅकेचे झोनल अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, ग्रा.प.सदश्य प्रफुल कोकाटे,नाधवडे नवलादेवी ब्राम्हणदेववाडी शाळेचे मुख्याध्यापक पाताडे सर, चव्हाण सर, सावंत सर,कदम मॅडम,केंद्रशाळा मुख्याध्यापक जाधव मॅडम, शरद नारकर सर,शेट्ये मॅडम,वि.मं.चारवाडी शाळा मुख्याध्यापक पास्टे सर,बौद्धवाडी शाळा मुख्याघ्यापक गोसावी सर, सरदारवाडी शाळा मुख्याध्यापक खंडागळे सर, हेमंत सावंत सरदार माध्यमिक विध्यालय नाधवडे च्या शिक्षिका मॅडम, पुर्व प्राथमिक शाळा शिडवणे नं.१ चे मुख्याध्यापक कुबल सर,केंद्रशाळा व्यवस्थापणसमिती अध्यक्ष विशाल पावस्कर, आरोग्य सेविका काटकर मॅडम, औदुंबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर, सचिव दिपक पावसकर, खजिनदार रुपेश कुडतरकर, नाधवडे ग्रामविकास मंडळाचे खजिनदार रविंद्र (बाबा) खांडेकर, दिगंबर इस्वलकर, दिपक सु.कुडतरकर, योगेश शेट्ये, योगेश घाडी, प्रफुल घाडी, प्रविण गुरव, संतोष गुरव, संतोष सावंत, गंगाराम कुडतरकर, भालचंद्र ताम्हणकर, प्रल्हाद नारकर, अनंत टोळवणी, दिगंबर शेट्ये, अंकित शेट्ये, आधी ग्रामस्त व मंडळाचे सभासद उपस्तित होते.