सोन्याचे दर महिनाभरात आणखी वाढणार; चांदीही लाख मोलाची होणार. सुवर्ण व्यवसायिकांचा अंदाज.

सोन्याचे दर महिनाभरात आणखी वाढणार; चांदीही लाख मोलाची होणार.   सुवर्ण व्यवसायिकांचा अंदाज.

     साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. सध्या बाजारात सोने प्रतितोळा ७१ हजार रुपयांवर असून, चांदी प्रतिकिलो ८१ हजारांवर आहे.काही महिन्यांत या दरांत अजून वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली.गुढीपाडवा, अक्षयतृतीया अन् लग्नसराईत नागरिक मोठ्या प्रमाणावर सोने-चांदी खरेदी करतात. यंदा साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा अन् अक्षयतृतीयेच्या पार्श्वभीवर तसेच मे मध्ये लग्नांचे मुहूर्त नसल्याने लग्नसराईला जरी 'ब्रेक' लागलेला असला तरी बाजारातील सोने-चांदीच्या उतार- चढावांमुळे नागरिकांची आतापासूनच दुकानांमध्ये दागिने खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.२४ कॅरेट सोन्यासाठी ७१ हजार रुपये भाव आहे, तर २२ कॅरेट सोन्यासाठी ६५ हजार ४०० भाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांमुळे अक्षयतृतीयेपर्यंत २४ कॅरेट सोन्यासाठी ७५ हजार रुपये प्रतितोळा इतका भाव होऊ शकतो, अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.