साकेडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

साकेडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

कणकवली.

   रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथ खासदार विनायक राऊत यांच्या साकेडी गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री पावनादेवी मंदिरात करण्यात आला. राऊत हे पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येऊ दे, असे गाऱ्हाणे सेनेच्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनी श्री पावनादेवीच्या चरणी घातले.
   यावेळी शाखाप्रमुख संदीप राणे, युवासेनेचे विभागप्रमुख किरण वर्दम, माजी शाखाप्रमुख मुरारी राणे, तुकाराम ढवण, भास्कर दळवी, सागर गुरव, तेजस वर्दम, सुनील घाडी, प्रसाद घाडी, अनंत सापळे, मजीद शेख, इक्बाल शेख, प्रेम डिसोझा, विठ्ठल वर्दम, अनंत पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. राऊत यांना साकेडी गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.