पर्यटन जिल्ह्याचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश नाही. तीर्थक्षेत्र योजनेत जिल्ह्याचा व कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा नामोल्लेख नाही: ग्रामस्थांनी व्यक्त केली खंत.

देवगड.
मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रा या योजनेची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली यानंतर देशातील १३९ तीर्थक्षेत्रांचा यात समावेश करण्यात आला. मात्र यामध्ये एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यात समावेश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मात्र या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा नामोल्लेख नसल्याने कुणकेश्वर मधील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेचे सुविधा उपलब्ध केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशातील ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ धार्मिक स्थळ अशी एकूण १३९ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे.या योजनेत महाराष्ट्रातील सिद्धिविनायक मंदिर ,सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च मरोळ ,मॅगेन डेव्हिड सिनेगॉन भायखळा, महालक्ष्मी मंदिर,गोदाजी पाश्वत मंदिर,सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च, चैत्यभूमी दादर, नेसेट एलियाहू सिनेगॉग फोर्ट, अंग्यारी अग्निमंदिर, माउंट मेरी चर्च शार हरहमीम सिनेगॉग मज्जिद भंडार, ज्योतिबा मंदिर, मुंब्रादेवी मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, वाळकेश्वर मंदिर, मलबार हिल, संत चोखामेळा समाधी पंढरपूर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई ,संत सावतामाळी समाधी मंदिर अरण, जैन मंदिर कुंभोज, चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, विठोबा मंदिर पंढरपूर, रेणुका देवी मंदिर माहूर ,सेंट अँड्रू चर्च वांद्रे, शिखर शिंगणापूर, श्री संत नामदेव महाराज देवस्थान,सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च अंधेरी, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, संत एकनाथ समाधी पैठण, जैन स्मारके एलोरा लेणी, विघ्नेश्वर मंदिर ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर ,मुक्तिधाम, सप्तशृंगी मंदिर वणी, काळाराम मंदिर, गजपंथ, संत साईबाबा मंदिर शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर पाली, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, श्री दत्त मंदिर औदुंबर, केदारेश्वर मंदिर, वैजनाथ मंदिर परळी, गणपतीपुळे,मार्लेश्वर मंदिर महाकाली देवी अष्टदजपूज्य रामटेक दीक्षाभूमी चिंतामणी कळंब आदी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
समावेश नाही याची खंत ; पण समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार :सरपंच महेश ताम्हणकर.
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा याबाबत जीआर निघाला आहे. यामध्ये देशभरातील १३९ एकूण तीर्थक्षेत्रे निवडण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे मात्र यामध्ये एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातील विशेषतः देवगड तालुक्यातील कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा यात समावेश नाही ही आम्हाला खंत आहे. याबाबत आम्ही आमदार नितेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून देणार व दक्षिण कोकणची काशी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा यामध्ये सहभाग व्हावा यासाठी विनंती करणार असल्याची माहिती कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांनी दिली.