पाट येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

पाट येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

 

कुडाळ

 

       एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कुलच्या मैदानावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.
         आकाश फिश मिलचे प्रमुख श्याम सारंग, अशोक सारंग डायरेक्टर ऑफ आकाश फिश मिलचे नकाश सर, एच. आर. राजाराम बेदरकर, जनरल मॅनेजर फरहान आचरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे वित्त अधिकारी श्याम काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिल्या मैदानाचे उद्घाटन श्याम सारंग दुसऱ्या मैदानाचे उद्घाटन अशोक सारंग तिसऱ्या मैदानाचे उद्घाटन कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मैदान क्रमांक चारचे उद्घाटन मुख्याध्यापक राजन इंजनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
       व्यासपीठावर सर्व संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील नामांकित प्रतिष्ठित व्यक्ती, खेळाडू, पंच, राज्य, जिल्हा व तालुका कबड्डी फेडरेशनचे सर्व अधिकारी उपस्थित होते. पहिला सामना पुरुष गटात उत्कर्ष भांडुप विरुद्ध इच्छाशक्ती पालघर यांच्यामध्ये सुरू झाला. महिला गटात प्रकाश तात्या बालवडकर पुणे विरुद्ध स्वराज्य रत्नागिरी यांच्यात सुरू झाला. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी. एस. एल. देसाई विद्यालय पाट माजी विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन याच्याद्वारे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार तीन दिवस पहायला मिळणार आहे.