श्री देव वेतोबा व श्री देवी भावई वर्धापन दिन सोहळा ३० एप्रिल व १ मे रोजी

वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावातील श्री देवी भावईचा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. 30 एप्रिल 2025 व श्री देव वेतोबाचा गुरुवार दि.1 मे 2025 रोजी साजरा होणार आहे. दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 8.00 वा. श्री देवी भावई लघुरुद्र व श्री देव वेतोबा सकाळी 10.00 वा. श्री देव रवळनाथ व इतर देवतांवर अभिषेक, दुपारी 12.00 वा.श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1.00 ते 3.00 वा.महाप्रसाद, सायंकाळी 4.00 वा.स्थानिक भजने सायंकाळी 6.30 वा. आरोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. तसेच गुरुवार दि.1 मे रोजी सकाळी 8.00 वा.श्री देव वेतोबा चरणी लघुरुद्र, सकाळी 10.00 वा. देवतांवर अभिषेक, दुपारी 12.00 वा.श्री सत्यनारायण महापूजा दुपारी 1.00 ते 3.00 वा. आरती व तीर्थप्रसाद, बारापाच देवतांना महानैवेद्य महाप्रसाद सायंकाळी 4.00 वा.स्थानिक भजने, दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्य प्रयोग असे विविध कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भक्तगणांनी या सुवर्ण क्षणात उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान मंडळ तर्फे करण्यात आले आहे.