मालवण येथे २२ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय शिबिराचे आयोजन.

मालवण येथे २२ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय शिबिराचे आयोजन.

मालवण.

   भारतीय नौदल दिन आणि नौदल सप्ताह मालवण येथे साजरा होत आहे. या निमित्त भारतीय नौदलाकडून विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मालवण शासकीय रुग्णालयात दि. २२ नोव्हेंबर रोजी मालवणवासियांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
   यासाठी मुंबईहून भारतीय नौदलाच्या नामांकित हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथक उपलब्ध असणार आहे. या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय नौदलाकडून करण्यात आले आहे.