मळगाव येथील आयोजित महिलांच्या कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सावंतवाडी.
मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालय आयोजित व राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत घेण्यात आलेल्या महिलांच्या कॅरम स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.ही कॅरम स्पर्धा (कै.) अनिल (हरी) सदाशिव तिरोडकर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधुन "अनिल / अनुराधा तिरोडकर सदाप्रेम" योजनेततुन डॉ. उर्मिला व डॉ. तन्मय लाल यांच्या देणगीतुन घेतली जाते. या स्पर्धेत सखी महिला मंडळ, मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीनी तसेच गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी राधारंग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष ऍड.पी.डी. देसाई यांनी राधारंग फाऊंडेशन आणि ती करीत असलेले सामाजिक कार्य याची सविस्तर माहिती दिली.
महिलांच्या या कॅरम स्पर्धेत विजेती संध्या हेमजी, उपविजेती - प्रतिक्षा गावकर, तृतीय पारितोषिक विजेती - वनिता सामंत, श्रुती जाधव या मानकरी ठरल्यात. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कॅरम स्पर्धा संपताच वाचनालयच्या रमाकांत खानोलकर सभागृहात करण्यात आला.कॅरम स्पर्धेतील विजेत्यांना राधारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, खानोलकर वाचनमंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर, वाचनालय संचालक श्री. मुळीक आणि जेष्ठ महिला मीना मळगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी, राधारंगचे पदाधिकारी मयांक शिरोडकर, प्रणीत गोसावी यांनी मेहनत घेतली.