श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला पखवाज संगीत महोत्सव

रत्नागिरी
रत्नागिरी येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे रंगला भजनारंग ७५ पखवाज संगीत महोत्सव. श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार महेश सावंत प्रस्तुत या कार्यक्रमात पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, संदेश पारधी, मंदार जाधव तसेच गायक/हार्मोनियम वादक अमित उमळकर, महेश होळंब, विद्या कवठणकर, कु. कशिष खडपकर, हार्मोनियम वादिका कु. लावण्या मिरकर, तबला वादक कु. सुरज पालव यांच्यासमवेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्यातील 75 पखवाज चे गणेश तांडव पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या नेतृत्वात संपन्न झाले. यावेळी अगदी मंदिराच्या थेट समोर सेवा करायची संधी सर्वांना मिळाली त्याबद्दल देवस्थान ट्रस्ट आणि सर्व पदाधिकारी गणपतीपुळे यांचे श्री जगन्नाथ संगीत विद्यालयतर्फे आभार मानण्यात आले यावेळी शरद प्रतिष्ठानच्या रत्नागिरी जिल्यातील पदांची नियुक्ती पत्रदेखील प्रदान करण्यात आली.