मदर तेरेसा स्कूल येथे जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा.

मदर तेरेसा स्कूल येथे जागतिक विज्ञान दिन उत्साहात साजरा.

वेंगुर्ला.

  भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांनी रमन प्रभावाचा शोध लावला, या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
   आपल्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपले जीवन अधिक सोपे करण्यासाठी विज्ञानाची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल याविषयी आपली भाषणे  विद्यार्थ्यांनी सादर केली यामध्ये पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांनी विविध माहिती दिली.त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गवार विज्ञान प्रतिकृती तयार करून सर्व शाळेसाठी या प्रतिकृती च प्रदर्शन ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुंदर अश्या विज्ञान प्रतिकृती स्वतः मेहनत घेऊन तयार केल्या.
२१ व्या शतकात वावरणारी नवीन पिढी विज्ञानाभिमुख असावी.विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा, जिज्ञासावृत्ती, प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव जाणून घेण्याची वृत्ती जोपासली जावी यासाठी आजचे विज्ञान संशोधक वृत्तीचे असायला हवे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित शिक्षिका ग्लॅनिस पिंटो, मृण्मयी परब, नीलम नवार यांनी मार्गदर्शन केले.
   या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.पूजा गावडे यांनी पर्यावरण व विज्ञान याची सांगड घालून पर्यावरण संवर्धन विषयक जागृती केली. कार्यक्रमाचे आभार ग्लॅनिस पिंटो  यांनी मानले.