कणकवलीच्या आयुषी पुजारीचा राज्यात चौथा क्रमांक.....रायटिंग विझार्डस् ऑलिंपियाड हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश
कणकवली
कणकवली येथील सेंट उर्सुला वरवडे स्कूलची दहावीची विद्यार्थिनी आयुषी अशोक पुजारी हिने रायटिंग विझार्डस् ऑलिंपियाड हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात चौथा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे.२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत आयुषीने आपल्या सुंदर, नीटनेटक्या आणि सातत्यपूर्ण हस्ताक्षराच्या बळावर हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वर्ग तसेच पालकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले, असे आयुषीने सांगितले. आयुषी ही कणकवलीतील पुजारी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अशोक पुजारी आणि ममता पुजारी यांची कन्या आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे आणि तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्वल झाले आहे.
konkansamwad 
