शिवसेना कुडाळ संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना. शिवसेना संपर्क कार्यालयात मिळणार विद्यार्थ्यांना शासकीय दाखले.

शिवसेना कुडाळ संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना.  शिवसेना संपर्क कार्यालयात मिळणार विद्यार्थ्यांना शासकीय दाखले.

कुडाळ.

   शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर, योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या सहकार्यातून शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड यशवर्धन राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कुडाळ मध्यवर्ती संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची स्थापना आज सोमवारी 27 मे.रोजी करण्यात आली आहे.याचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या विद्यार्थी मदत कक्षाच्या स्थापनेचे उदघाटन करण्यात आले. आज शिववसेना कार्यालयात अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हजेरी लावून नोंदणी केली.
   यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड यशवर्धन राणे, पावशी विभाग प्रमुख जयदीप तुळसकर, धर्मा सावंत, कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, अरविंद करलकर, शहर प्रमुख नागेश नेमळेकर, संजय भोगटे, कुडाळ युवासेना तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर, जेष्ठ शिवसैनिक रमेश हरमलकर, नेरूर विभाग प्रमुख किशोर सावंत उपस्थित होते.
   या विद्यार्थी कक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच कॉलेज युवक युवती यांना शासकीय दाखले उदा.उत्पन्न दाखला, नॉन क्रिमेलियेर, राष्ट्रीयत्व दाखला, जातीचा, वय अधिवास दाखला आदी शासकीय दाखले त्वरित उपलब्ध करून दिले जातील विद्यार्थी, कॉलेज युवक युवती यांनी लागणारी आवश्यक कागदपत्रे फोटो पॅनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रेशकार्ड, तलाठी अहवाल किंवा शासकीय कर्मचारी किंवा निवृती वेतन धारक असल्यास फॉर्म १६ आदी, रहिवाशी दाखला घेऊन शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात या नंबर शी 9422374139 संपर्क साधावा असें आवाहन शिवसेनेच्या वतीने आज करण्यात आले आहे. (टीप -: अन्य कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असल्यास आपणास तिथे सूचित केले जाईल याची नोंद घावी. कुडाळ शिवसेना कार्यालय. 9422374139.