एबीव्हीपी सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न  

एबीव्हीपी सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न  

वेंगुर्ला

 

     अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार, 13 जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी डॉ. वसुधा मोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. कोकणातील रोजगाराच्या संधी तसेच कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींमधून कसे मार्ग काढून यशस्वी करिअरकडे जावे, याबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  यावेळी बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य गोस्वामी सर, एबीव्हीपी सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विनीत परब तसेच कार्यक्रम प्रमुख अथर्व परब उपस्थित होते.एबीव्हीपीच्या या उपक्रमामुळे यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.