वेंगुर्लेत कर्जाची १०० टक्के परतफेड करणाऱ्या विकास संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा आज सत्कार समारंभ
वेंगुर्ला
बँक पातळीवरील वसुलपात्र कर्जाची 100 टक्के परतफेड केलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील विकास संस्थांच्या व्यवस्थापकीय कमिटी सदस्यांचा सत्कार आज मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.हा कार्यक्रम साई डिलक्स हॉल, सुंदर भाटले वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्गचे अध्यक्ष मनीष दळवी आणि संचालक मंडळ या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत.कर्जाची शिस्तबद्ध परतफेड करून संस्थांचा आर्थिक पाया मजबूत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणे, हा या सत्काराचा उद्देश आहे.या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व विकास संस्था व्यवस्थापकीय कमिटी सदस्य आणि सचिव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
