मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे.

मतदार ओळखपत्र नसेल तर ओळख पटविण्यासाठी लागणार ही कागदपत्रे.

सिंधुदुर्ग.

   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यामध्ये  7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर मतदार त्यांची ओळखपत्र पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील, जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करुन  शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे कागदपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.
   आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/ पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिष्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याव्दारे नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र.