परुळे बाजार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन

परुळे बाजार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन

 

वेंगुर्ला
 

    वेंगुर्ला येथील परुळे ग्रामपंचायतमार्फत आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थी, नागरिकांसाठी योग शिबिराचे आयोजन केले गेले होते. ग्रामपंचायत परुळेबाजार सभागृह येथे योग शिबिरामध्ये  विद्यार्थी, ग्रामस्थ, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी योग प्रशिक्षक डॉ. प्रशांत साळगावकर, सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, आरोग्य समुदाय अधिकारी काजल परब, आरोग्य सेविका आर. आर.  पिंगुळकर, आरोग्य सेवक मनोज दूधवडकर, शिवाजी चव्हाण,  अंगणवाडी सेविका ऋतुजा राऊळ, राजश्री परुळेकर, रवींद्र गोसावी आदी उपस्थित होते.