कणकवलीतील व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांनी घेतली विनायक राऊत यांची भेट.

कणकवलीतील व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांनी घेतली विनायक राऊत यांची भेट.

कणकवली.

  लोकसभेत ज्यावेळी जीएसटी कायदा पास होत होता, त्यावेळी आम्ही आवाज उठविला होताच. जीएसटी मुळे व्यापाऱ्यांची होणारी अडचण आम्हाला ज्ञात असून इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर जीएसटीबाबत निश्चितपणे फेरविचार करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केला जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींबाबतही उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिले.
    येथील विजय भवन मध्ये शहरातील व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघासोबत श्री. राऊत यांची बैठक झाली. यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, सचिव विलास कोरगावकर, राजू पारकर, सुहास हरणे, अभिजीत काणेकर, बंडू खोत, अतुल कामत, शांतीलाल पटेल, चेतन अंधारी, आदित्य सापळे, राजू काळगे, सुनील पारकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री मराठे, मनोहर पालेकर, दादा कुडतरकर तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, रामू विखाळे, राजू राठोड, जयेश धुमाळे व इतर उपस्थित होते.
   व्यापारी संघटने सोबत झालेल्या बैठकीत जीएसटी मुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. जीएसटी कमी होण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावेत असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर होलसेल व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या मालाला 30 दिवसात पेमेंट न केल्यास लावण्यात येणाऱ्या टॅक्स बाबतही चर्चा झाली. व्यापाऱ्यांना येत असलेल्या अडचणी आपल्याला ज्ञात असून आमचे सरकार आल्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम निश्चितपणे करू असे श्री. राऊत यांनी त्यावेळी सांगितले.
    ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासाबाबतच्या बंद झालेल्या सुविधा तसेच वाढती महागाई याबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा पुन्हा देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असे श्री. राऊत यांनी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नागरिक वास्तूसाठी यापूर्वी आपण खासदार निधी दिलेला असून भविष्यातही आम्हाला मदत करा असे आवाहन जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने करण्यात आले. तर आपण सदैव तुमच्या सोबत असून तुम्हाला लागणारी मदत वेळोवेळी निश्चितपणे करू अशी ग्वाही श्री. राऊत यांनी दिली.