कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी. वालावल बंगेवाडीतील दरडग्रस्त ग्रामस्थांना केली आर्थिक मदत.
कुडाळ.
तालुक्यातील सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवन, कवटी या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची तसेच पुरहानी झालेल्या ठिकाणांची व दरड बाधित क्षेत्राची पाहणी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केली. कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश आ. वैभव नाईक यांनी दिले.तसेच आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विधानसभेत याबाबत आवाज उठविणार असल्याचेही आ. वैभव नाईक यांनी सांगितले.
वालावल बंगेवाडी येथे डोंगर कोसळून १२ ते १४ घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.डोंगरातून कोसळलेली दरड चक्क घरांना लागली आहे. आ.वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन दरड बाधित क्षेत्राची पाहणी केली.व ग्रामस्थांना आर्थिक मदत देखील केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,कृष्णा धुरी, रुपेश पावसकर, राजू कविटकर, नेरुर विभागप्रमुख शेखर गावडे, बंगेवाडीतील ग्रामस्थ सुनील बंगे, केशव बंगे, दिवाकर बंगे, विष्णू बंगे, बाळा बंगे, सुभाष बंगे, सुशील बंगे, मंगेश बंगे, राजन बंगे, निलेश बंगे वालावल ग्रामस्थ सुनील करवडकर, रवी कावळे, विलास चौधरी, पप्पू पेडणेकर, किशोर नेरुरकर, सुनील नेरुरकर आदी.
सरंबळ येथे नेरुर उपविभाग प्रमुख श्यामसुंदर परब, नेरुर युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर, सरंबळ युवासेना शाखाप्रमुख संतोष राणे,सरंबळ युवासेना उपशाखा प्रमुख श्यामसुंदर करलकर गुरुनाथ परब,गणपत (बाळा) जाधव,अजय राणे, संतोष कदम, निखिल गोसावी, मिलिंद वारंग, सुहास जाधव,उत्तम कदम आदी.
नेरूर येथे सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर,मंजू फडके, समीर नाईक, रोशनी नाईक, संतोष कुडाळकर, मयुरी नाईक, श्रीधर नाईक आदी.
चेंदवन, कवटी येथे मंगेश बांदेकर, रुपेश वाडयेकर, रुपेश खडपकर, राजन खोबरेकर, किरण खोचरेकर, प्रकाश ठुमरे, आनंद गुरव आदी उपस्थित होते.