भारतीय महिला फुटबॉल संघ विजयी
येनगॉन (म्यानमार)
सध्या भारताचा महिला फुटबॉल संघ म्यानमारच्या दौऱ्यावर असून उभय संघात दोन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे फुटबॉल सामने खेळविले जात आहेत. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने म्यानमारचा २-० अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामध्ये भारतीय संघातील प्रितीका बर्मनने शानदार दोन गोल नोंदविले.चीनमधील सुझोयु येथे १ ते १७मे दरम्यान होणाऱ्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेसाठी सरावाकरिता भारतीय फुटबॉल फेडरेशनने महिला फुटबॉल संघाकरिता म्यानमारचा दौरा सरावासाठी आयोजित केला आहे.म्यानमारचा संघ या आंतरखंडीय स्पर्धेसाठी यापूर्वीच पात्र ठरला आहे. आता उभय संघातील दुसरा मित्रत्वाचा सामना शनिवारी येथे खेळविला जाईल.पहिल्या सामन्यात पहिल्या ३७ मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. मात्र भारताची गोलरक्षिका मुनी हिची कामगिरी या सामन्यात दर्जेदार आणि भक्कम झाली. म्यानमारचे अनेक चढाया तिने थोपविल्या. ३१ व्या मिनिटाला भारतीय संघाची कर्णधार एन. जुलनने अलिशा लिंगडोहकडून मिळालेल्या पासवरुन म्यानमारच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली.

konkansamwad 
