उद्या सिंधुदुर्गात ‘निर्भय बनो’ अभियानाच्या माध्यमातून जनजागृती.

उद्या सिंधुदुर्गात ‘निर्भय बनो’ अभियानाच्या माध्यमातून जनजागृती.

सावंतवाडी.

   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान विरोधी काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी "निर्भय बनो" अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मतदारात जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत या अभियानाचे समन्वयक संदीप निंबाळकर व किशोर वरक यांनी दिली. दरम्यान या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ तारखेला आणि सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत तर सकाळी १० कुडाळ येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी अँड. विश्वंभर चौधरी व असिम सरोदे यांची प्रमुख उपस्थित असणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.