कुशेवाडा आंबेगाळीचा प्रभंजन राणे पी.एच.डी. प्रवेश परीक्षेत देशात पाचवा.

कुशेवाडा आंबेगाळीचा प्रभंजन राणे पी.एच.डी. प्रवेश परीक्षेत देशात पाचवा.

वेंगुर्ला.

    तालुक्यातील कुशेवाडा आंबेगाळीचा प्रभंजन भानुदास राणे हा भारतीय कृषी अनुसंधान संस्था (नवी दिल्ली) मार्फत घेतलेल्या ICAR AICE -JRF/SRF 2023-24 च्या पी.एच.डी. प्रवेश परीक्षेमध्ये संपुर्ण देशात पाचव्या क्रमांकाने  उत्तीर्ण झाला आहे.तसेच EWS आरक्षणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. भारत सरकार मार्फत त्याला पी.एच.डी. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.भारतीय कृषी अनुसंधान संस्था (नवी दिल्ली) मार्फत घेण्यात आलेल्या junior research fellowship 2021(PG) मध्ये संपूर्ण देशात तो दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तसेच EWS आरक्षणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता . तसेच इयत्ता दहावी मध्ये पाट हायस्कूल मध्ये ९६ टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला होता.
    या यशाबद्दल त्याचे वडील भानुदास राणे व आई काजल राणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.कुशेवाडा गावातून प्रभंजन याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.