राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपिठावर. मुंबईत होणार सभा.

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपिठावर.   मुंबईत होणार सभा.

मुंबई.

    राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती होईल अशी माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली.लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच प्रचार सभा घेण्याचे पण त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता ही महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे.