कणकवली पंचायत समिती सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव

कणकवली
कणकवली पंचायत समिती सदस्यपदाच्या आरक्षण प्रक्रियेला सोमवारी कणकवली तहसील कार्यालयात प्रारंभ झाला. या प्रक्रियेत सभापतीपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठरले. त्यामुळे पुढील सभापती कोण असतील, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.आरक्षण प्रक्रिया प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे पार पडली. यामध्ये नांदगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठरले.
तसेच, जानवली मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला. उर्वरित ११ मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर त्यापैकी ५ महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत.
आरक्षण प्रक्रियेसाठी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तहसील कार्यालयात उपस्थित होते.
कणकवली पंचायत समिती सदस्यपदाचे आरक्षण :
मतदारसंघ आरक्षण प्रवर्ग
तळेरे सर्वसाधारण
खारेपाटण सर्वसाधारण
नांदगाव ओबीसी महिला
कासार्डे ओबीसी सर्वसाधारण
जानवली अनुसूचित जाती महिला
बिडवाडी सर्वसाधारण महिला
लोरे सर्वसाधारण महिला
फोंडा सर्वसाधारण
हरकुळ खुर्द सर्वसाधारण
हरकुळ बुद्रुक सर्वसाधारण महिला
वरवडे सर्वसाधारण
कलमठ ओबीसी सर्वसाधारण
कळसुली सर्वसाधारण
ओसरगाव सर्वसाधारण महिला
नाटळ ओबीसी महिला
नरडवे सर्वसाधारण महिला