भुईबावडा घाटात कोसळली दरड

वैभववाडी
अवकाळी पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटमार्गाला बसला आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर करूळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. करूळ घाटातून सद्यस्थितीत धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेले चार दिवस सह्याद्री पट्ट्यासह तालुक्यात पावसाची धारा सुरूच आहे.