दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी गढीताम्हाणेतील दोघा जणांवर गुन्हा दाखल.
देवगड.
तालुक्यातील एका गावात कराराने दिलेल्या बागेत कुंपण करायच्या कारणावरून भांडण करून रात्री घरी जाऊन लाकडी दांड्याने मारहाण करून ठार मारल्याची धमकी दिल्याप्रकरणी गढीताम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम (५४) यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य विकास कदम व विकास चंद्रकांत कदम या पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ मार्च रोजी रात्री ११:३० च्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गढीताम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम यांनी तेथील विकास चंद्रकांत कदम यांचे भाऊ दत्तात्रय कदम यांची भाग तीन वर्षाच्या करारावर घेतली होती. या बागेत कुंपण करायचे होते या कारणा वरून झालेल्या भांडणातून दिनांक २२ मार्च २०२४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास यशवंत कदम हे आपल्या घरात झोपलेले असताना आदित्य विकास कदम व (२२ ) व विकास चंद्रकांत कदम ( ५४) या पिता पुत्राने घरात येऊन मारहाण व शिवीगाळ केली . तर या घटनेमध्ये आदित्य यांनी यशवंत कदम यांच्या डाव्या पायावर लाकडी दांड्याने मारहाण केली .तर विकास कदम यांनी शिवीगाळ करून तू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. याबाबत यशवंत कदम यांनी दिलेले तक्रारीनुसार पोलिसांनी आदित्य कदम यांचे वडील विकास कदम यांच्या विरुद्ध भादवि कलम ३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम करत आहेत.