रेडी यशवंत गडावर २७ व २८ एप्रिल रोजी राज्यव्यापी दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन.
वेंगुर्ला.
गड किल्ल्यांचे गतवैभव प्राप्त करावयाच्या दृष्टीने राज्यातील विविध संस्थामार्फत विविध किल्ल्यांवर गड संवर्धन मोहिमा ह्या आयोजित केल्या जात असतात.अश्याच एका महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकाला समुद्र तसेच गोवा राज्याच्या सिमेला लागून असलेल्या राज्य ऐतिहासिक स्मारक किल्ले यशवंतगडावर येत्या शनिवार दि २७ व रविवार दि २८ एप्रिल ह्या दिवशी गड संवर्धन मोहिमेचे आयोजन एक ऐतिहासिक भटकंती समूह सांगली व शिवप्रेमी यशवंतगड (दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक तसेच गड संवर्धनात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था ह्या मोहिमेत सहभागी होणार आहेत.तरी सर्व दुर्ग व शिवप्रेमींनी ह्या गड संवर्धनाच्या कार्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंतगड शिवप्रेमी (दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी) यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
गेल्या वर्षभरातील झालेल्या दोन मोठ्या मोहिमेंनंतर गडाच्या तटबंदी व गडाचे जे रूप झाकले गेले ते उजेडात आणण्यात ह्या एक ऐतिहासिक भटकंती समूहाचा मोठा वाटा आहे.दर रविवारी यशवंतगडावर शिवप्रेमी यशवंतगड (दुर्गरक्षक प्रतिष्ठान) यांच्याकडून गडसंवर्धन मोहिमा ह्या होत असतात.तसेच इतर सामाजिक उपक्रमात देखील ह्या संस्थेचा सहभाग अग्रगण्य असतो.सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील संस्थांसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गप्रेमीना ह्या मोहिमेत जास्तीत संख्येने सहभागी व्हावेत असे आवाहन करण्यात येत.