घावनळे येथे विहिरीत पडलेल्या गव्यांना वनविभागाकडून जीवदान.

घावनळे येथे विहिरीत पडलेल्या गव्यांना वनविभागाकडून जीवदान.

कुडाळ.

    तालुक्यातील घावनळे (खुटवळवाडी)येथे पांडुरंग गोविंद नेवगी यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन गव्यांना वन विभागाकडून जीवदान देण्यात आले.सावंतवाडी वन विभागाला घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीमध्ये  2 गवे  पडले असल्या ची माहिती मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जलद बचाव पथक गव्यांच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता दोन गवे ज्यामध्ये एकाचे अंदाचे 4-5 वर्षे वयाचा नर गवा तसेच दुसरा अंदाजे 2 वर्षे वयाची मादी गवा असल्याचे निदर्शनास आले. विहिरीवर वाढलेल्या वेली चा अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडले असावेत असे  दिसून आले.अथक प्रयत्ना नंतर क्रेन च्या सहाय्याने दोन्ही गव्यांना विहिरी मधून बाहेर काढण्यात वन विभागाच्या रेस्क्यू टीम ला यश आले.
   वन्यप्राणी गवा हा आपल्या जैवविविधतेतील एक मोठा तृणभक्षी प्राणी असून तो आपल्या जीवसृष्टी तील एक  महत्वाचा घटक आहे, म्हणुन या आपल्या कोकणातील ठेव्याचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या सर्व सिधुदुर्गवासीयांनी असेच मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वन विभागामार्फत करण्यात येत आहे.
   ही बचाव मोहिम वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, वनपाल दिनेश टिपूगडे, वनरक्षक सचिन पाटील, वनरक्षक बदाम राठोड, शिवाजी पाटील, किरण गोसावी, पशुधन पर्यवेक्षक कामटेकर, वनसेवक यशवंत कदम, सिंधुदुर्ग वाईल्डलाईफ इमर्जन्सी रेस्क्यू अनिल गावडे तसेच घावनळे (खुटवळवाडी) गावचे सर्व स्थानिक ग्रामस्थ बांधव यांच्या सहकार्याने करण्यात आले.