हडपिड येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी प्रकटदिन व मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

हडपिड येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी प्रकटदिन व मठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

देवगड.

   श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड या मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा १० एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत आहे.या निमित्ताने श्री स्वामी समर्थ मठ हडपीड- देवगड येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी संत पीठाचे अधिष्ठान विठू माउली संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत पुंडलिक,संत गोरा कुंभार, संत नामदेव या संत सत्व दर्शन सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   या पाचव्या प्रकटदिन व मठाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रम मंगळवार ९ एप्रिल २०२४,सायं. ४ वा. पालखी मिरवणूक (श्री पावणादेवी मंदिर शिरगांव-शिरगाव निमतवाडी- हडपिड पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठापर्यंत)सायंकाळी ७ वाजता विठुमाऊली व पाच संतांच्या मंदिरातील सत्वांचे मठात आगमन.
    बुधवार १० एप्रिल २०२४ सकाळी ५ ते १० गणेश पूजन, पादुका पूजन, श्री सत्यनारायण महापूजा,१० ते १२लघुरुद्र, कुंकुमार्चन, नामस्मरण,दुपारी १२ ते ३ पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद.दुपारीच्या सत्रातील कार्यक्रम ४ ते रात्री १० या कालावधीत ह. भ. प. डॉ. प्रज्ञा देशपांडे, पुणे यांचे किर्तन श्री भगवती कला दिंडी (तोरसोळे), डबलबारी भजनाचा जंगी सामना हरि ओम प्रासादिक भजन मंडळ बुबा कु. तन्मय परब विरुध्द श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ बुवा सुशांत दि. जोईल .रात्री ८ ते १० यावेळेत महाप्रसाद सुरू राहील. आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थांच्या दर्शनाचा, तीर्थप्रसाद,महाप्रसादाचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ देवगडचे संस्थापक अध्यक्ष श्री व सौ प्रभाकर राणे व संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण स्वामी रत्न श्री व सौ नंदकुमार पेडणेकर तसेच सर्व स्वामी सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.