उत्कृष्ट सेवेसाठी डॉ. प्रणील साळुंखे यांचा SBI Life कडून विशेष गौरव
मालवण
ग्राहकांना उत्कृष्ट आणि विश्वासार्ह सेवा प्रदान केल्याबद्दल डॉ. प्रणील साळुंखे यांचा SBI Life Insurance Company Ltd. तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.SBI Life च्या "sbilife.co.in" च्या वतीने झालेल्या या गौरव सोहळ्यात SBI Life चे सल्लागार चंद्रकांत सावंत तसेच सक्सेस कॉम्प्युटर बागायतचे संचालक समीर पेडणेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. साळुंखे यांच्या ग्राहकाभिमुख कार्याची आणि समर्पित सेवेची प्रशंसा केली. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ वेळेवर मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या सन्मानामुळे आपल्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असल्याचे सांगत डॉ. प्रणील साळुंखे यांनी भविष्यातही ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
konkansamwad 
