आरोस, पाडलोस, इन्सुली, मडूरा विजेच्या प्रश्नांसंदर्भात सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेची महावितरण कार्यालयाला धडक. उप अभियंत्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धरले धारेवर.

सावंतवाडी.
आरोस, पाडलोस व आजूबाजूच्या पंचक्रोशीत विजेच्या प्रश्नांसंदर्भात तसेच जीर्ण पोल व वीज वाहिन्यांवर वाढलेली झाडी तसेच वारंवार लाईट जाण्याने पंचक्रोशीत ग्रामस्थांना होत असलेला त्रास तसेच अचानक कमी जास्त व्होल्टेज होत असल्याने होत असणाऱ्या वीज ग्राहकांचे नुकसान व त्रासाबाबत आज सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा येथील महावितरण कार्यालयात ग्रामस्थांसह धडक देत प्रश्नांची सरबत्ती केली यात अधिकारी श्री. यादव यांनी तात्काळ आपल्या सगळ्या मागण्यांची दखल घेत जीर्ण असलेले पोल तसेच वीज वाहिन्यांवर असलेली झाडी व आरोस पाडलोस पंचक्रोशीत वारंवार जाणाऱ्या लाईट संदर्भात स्वतः पाहणी करत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले त्याचप्रमाणे वाढते लाईट बिल चे प्रश्न देखील उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडल्यानंतर योग्यरीत्या यावर तोडगा काढण्याचे आश्वासन श्री यादव यांनी दिले.
यावेळी सिंधुदुर्ग स्वाभिमानी संघटनेचे उपाध्यक्ष आशिष सुभेदार सावंतवाडी तालुका समन्वयक मंदार नाईक सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेचे सभासद नंदू परब तसेच सदस्य सुनील नाईक ज्ञानेश्वर नाईक संदेश सावंत स्वप्निल जाधव रुपेश गुळेकर भाऊ गावडे प्रफुल्ल गोडकर शरद हळदणकर सागर जाधव आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.