बांदा येथे उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन.
सावंतवाडी.
स्वयंमदीप समता प्रतिष्ठान यांच्यावतीने सोमवार ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांदा सरपंच प्रियांका नाईक, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत, निवृत्त विस्तार अधिकारी सदाशिव आयनोडकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, प्राथमिक शिक्षक शांताराम असनकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, सत्यशोधक दिव्यांग संघटनेचे एम. पी. जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरात बांदा परिसरातील युवकांनी सहभाग घ्यावा आणि नाव नोंदणीसाठी ९९२३८२३८४० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन स्वयंपदीप समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय सरमळकर, उपाध्यक्ष तुषार कानसे, सचिव लाडू पिळगावकर यांनी केले आहे.