कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य पदी शैलेश जामदार यांची निवड.

कलाकार मानधन जिल्हा समिती सदस्य पदी शैलेश जामदार यांची निवड.

वेंगुर्ला.

   सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भाजपा चे कणकवली ग्रामीण चे मंडल अध्यक्ष व जिल्ह्यातील नामांकित डबलबारी बुवा संतोष कानडे यांची निवड करण्यात आली असून पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे .
  यामध्ये भाजपा चे निष्ठावंत कार्यकर्ते व वेंगुर्ला भाजपा सांस्कृतिक आघाडी चे अध्यक्ष व हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार शैलेश जामदार ( वेतोरे ) यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.गायन व मिमिक्री क्षेत्रात काॅलेज जीवनापासूनच पारंगत असलेले व सध्या " अनिता कराओके " च्या माध्यमातून गोवा व महाराष्ट्रात स्टेज शो करत असलेल्या एका जातिवंत कलाकाराला समिती मध्ये संधी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.