सावंतवाडीत उद्या माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे आयोजन.
सावंतवाडी.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे उद्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. याचे औचित्य साधून प्रवीणभाई भोसले मित्र मंडळ व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने प्रवीण भोसले यांचा अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा उद्या सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित केला आहे.
एक निष्कलंक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून प्रवीण भोसले सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी आपल्या आमदारकी व राज्यमंत्री पदाच्या कालावधीत बरीच विकास कामे केली आहेत. म्हणूनच त्यांचे मित्र मंडळ त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करीत असून यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री, रमाकांत खलप, गोवा हे उपस्थित राहणार आहेत.
त्याच बरोबर प्रवीण भोसले यांचे बंधू रवींद्र भोसले, कर्नल सुभाष भोसले, धैर्यशील भोसले, अजयसिंह भोसले, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार शिवराम दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश दळवी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे, विकास सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर, ॲड. संदीप निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.