सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भिजत घोंगडे......मुंबईतील सिंधुपुत्र आमदारांचा कोकणवासियांच्या हक्कासाठी लढा!
सावंतवाडी
कोकण रेल्वेवरील सावंतवाडी टर्मिनसचे काम वर्षानुवर्षे रखडलेले असतानाच, मुंबईतील जोगेश्वरीचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणवासियांच्या या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करावे, कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा दद्यावा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांमुळे कोकणातील हजारो प्रवाशांच्या सोयीसह रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील, असे आमदार नर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) गेली अनेक वर्षे या प्रश्नावर लढा देत आहे. संघटनेचे संदीप गुरव, नंदकुमार ताम्हणकर, शैलेश बांदेलकर, केशव पांचाळ, जगन्नाथ कदम यांचे प्रयत्न आणि आता आमदार बाळा नर यांच्या पुढाकारामुळे मागणीला नवे बळ मिळाले आहे.

konkansamwad 
