खर्डेकर महाविद्यालयात बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंग्रजी विभागाची वक्तृत्व स्पर्धा संपन्न.
वेंगुर्ला.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे याही वर्षी महाविद्यालयातील विद्यर्थासाठी इंग्रजी भाषेच्या स्पर्धेचे आयोजन दि. १८डिसेंबर २०२३ करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत बी.कॉम प्रथम वर्षातील सानिका वराडकर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक नोंदविला तर सानिका गावडे व सोनाली चेन्दवणकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच योजना नवार आणि फाल्गुनी नार्वेकर यांची परीक्षकांनी उत्तेजनार्थ निवड केली. सदर स्पर्धेच्या उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले यांनी केले. उदघाटन प्रसंगी मा. प्राचार्यानी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत महाविद्यालयाचे विशेषतः इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून खर्डेकर साहेबांचे नाव उज्वल करावे अशी भावना वेक्त केली. स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे प्रा. देविदास आरोलकर, प्रा. वामन गावडे आणि प्रा. बी. एम. भैरट यांनी परीक्षण केले. सदर स्पर्धेचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मनीषा मुजुमदार यांनी करून स्पर्धा आयोजीत करण्याचा हेतू व उद्देश स्पष्ट केला तर डॉ. बी. जी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंग्रजी भाषेच्या प्रा. सौ. एस.एस. कांबळी यांनी विशेष प्रयत्न केले.
या स्पर्धेत क्रमांक मिळालेल्या स्पर्धकांचे दि.२६ डिसेंबर रोजी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी आयोजित विशेष कार्यक्रमात पाहुण्याचं हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.