वानिवडे सरपंच संयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास निमंत्रण.
देवगड.
तालुक्यातील वानिवडे गावचे सरपंच सुयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंच आहेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुक्यातील वानिवडे गावच्या सरपंच सुयोगी घाडी यांना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. नामनिर्देशित प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय १५ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीला पोहोचणार आहेत.स्वातंत्र दिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रतिनिधींना निमंत्रण पत्रे दिली जातील. १४ ऑगस्ट २०२४ रोजी पंचायत राज मंत्रालयाकडून महिलांच्या समस्यांवर कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातील. १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.