बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात ग्रीन लिटरेचर भित्तीपत्रकाचे आयोजन

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात  ग्रीन लिटरेचर भित्तीपत्रकाचे आयोजन


वेंगुर्ला 
वेंगुर्ला येथील खर्डेकर महाविद्यालयात  बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या  जयंती निमित्ताने महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत "साहित्य व निसर्ग" या विषयावर भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले. सदर भित्तीपत्रकाचे उदघाट्न महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ.विलास देऊळकर, नॅक समनव्यक एस.एच.माने, नॅक सल्लागार समिती सदस्य बी.एम.भैरट, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार,तत्वज्ञान  विभाग प्रमुख डॉ. एस.एस.भिसे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख जे.वाय. नाईक व महाविद्यालयातील  इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी  उपस्थित होते.सदर भित्तीपत्रकासाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एम.एम.मुजुमदार व डॉ. बी.जी.गायकवाड यांचे विद्यार्थाना मार्गदर्शन लाभले आणि भित्ती पत्रकासाठी इंग्रजी विभागाच्या विद्यार्थनीही उत्साहाने सहभाग नोंदवीला.