दीपस्तंभ फाऊंडेशन संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

दीपस्तंभ फाऊंडेशन संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 

दोडामार्ग


    प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी दीपस्तंभ फाऊंडेशन (रजि) संस्थेच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील विविध गावातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून ही संस्था दोडामार्ग तालुक्यातील गरजू कुटुंबासाठी गणपतीमध्ये गणेशपूजन व प्रसाद साहित्य वाटप, दिवाळीत वनवासी,भटक्या, विमुक्त, उपेक्षित समाजातील गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करते तसेच याहीवर्षी १०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे दीपस्तंभ फाऊंडेशन यांच्यावतीने वाटप करण्यात येत आहे असे गुरुनाथ नाईक यांनी सांगितले. यावेळी तळेखोल गावातील वसंत राऊळ, रिया आधारे, अथर्व नाईक, युवराज वडार, आर्यन नाईक, अमन व इरफान नाईकवाडी, बोडदे गावातील सुकुरमनी सोमतोड, गौतम सोरेन, कीर्ती जाधव, रेवा नाईक, तन्मय सावंत, हर्ष नाईक, कुडासे गावातील वेदांत गवस, ओमकार देसाई, अनंत सांगुर्डेकर, गणेश देसाई, जयेश शेटये,  तळेखोल गावातील आर्या सावंत, प्राची न्हावी, स्वरा सावंत, विठ्ठल दळवी, विनायक सावंत इत्यादी विद्यार्थ्यांना मंडळाचे अध्यक्ष, गुरुनाथ नाईक, समाजिक कार्यकर्ते संदीप नाईक, विनय सावंत, साबाजी चारी, नमित नाईक, सिद्धेश नाईक, सौ. स्नेहलता नाईक, सौ. दुर्वा नाईक याच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.